Labels

Tuesday, April 25, 2017

मेंढरांची सेना चाले

मेंढरांची सेना चाले, मेंढरांची सेना चाले,
एक निघाली मेंढी, मागे मेंढरांची सेना चाले


एक राहायाला, पाठी सगळे कळप आले, मेंढरांची सेना चाले
कूपमंडूक न्यायाने घर हेच सारे जग झाले, मेंढरांची सेना चाले
बाहेर ना राम वाटे, सारे खूपच नीरस झाले, मेंढरांची सेना चाले
विहिरीच्या घनफळी, सागरही रिते झाले, मेंढरांची सेना चाले
कुरणाच्या कुंपणात, वन विसरते झाले, मेंढरांची सेना चाले
पोटासाठी चरायला, मान वाकवते झाले, मेंढरांची सेना चाले
मावळता उजेडाची, आशा वाटेनासे झाले, मेंढरांची सेना चाले
लोकरीच्या उबेसाठी, स्वप्न वाळवंट झाले, मेंढरांची सेना चाले
डोळे झाकून डोळस, एकामागे एक आले, मेंढरांची सेना चाले
कळपात, एकट्याच्या कौशल्याचे शिरकाण झाले, मेंढरांची सेना चाले
आकाशात मेंढपाळ
काठी ठोकत हसत,
बोले, “बुद्धिजीवी पहा कशी
मेंढरांची सेना चाले...”

-कौस्तुभ दीक्षित
२५ एप्रिल, २०१७

No comments:

Post a Comment