'Suits'चे ६ Seasons बघून झाले. Thanks to Amazon Prime (७वा Prime वर नाहीये). अनेक दर्जेदार इंग्रजी मालिकांमध्ये नक्कीच या मालिकेची गणना करता येईल. Gabriel Macht, Patrick J. Adams या दोन मुख्य कलाकारांनी सहाही Seasons उत्कृष्ट काम केलं आहे. Harvey Specter आणि Mike Ross खरंच कोणी असतील तर अगदी असेच असतील इतकं त्यांना जिवंत उभं केलं आहे. न्यूयॉर्कमधला एक सुप्रसिद्ध कॉर्पोरेट वकील असलेला Harvey, त्याची बेडर वृत्ती, प्रतिस्पर्ध्याला अजिबात दया न दाखवता चारीमुंड्या चीत करणारा त्याचा कणखरपणा, आणि हळूहळू पुढे येत गेलेली त्याची हळवी, भावनिक बाजू.... Gabriel Macht हार्वेच्या पात्राला पुरेपूर न्याय देतो.
तीच गोष्ट Mike Ross ची. दुसऱ्यांसाठी पैसे घेऊन परीक्षा देणारा, एकपाठी, तल्लख स्मृती असणारा Bike Messenger ते सहाव्या सीजनच्या अखेरीस New York Bar मध्ये स्वीकारला गेलेला Mike Ross… या पात्राला खूप कंगोरे आहेत. तो हुशार आहे, तल्लख आहे आणि तो संवेदनशीलही आहे. ही संवेदनशील आणि तत्वनिष्ठ वृत्ती त्याला अनेकदा अडचणीत आणते खरी पण त्यातून स्वतःच्या क्षमतेवर आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने त्यातून पार पडतो. Mike च्या भूमिकेचा हा प्रचंड मोठा ग्राफ पॅट्रिक जे अॅडम्सने अतिशय सुंदररीत्या सहाही सीजन्स दाखवला आहे.
इतर सहकलाकारांबाबतीतही हेच… कणखर, matured, leader आणि तरीही संवेदनशील असलेली जेसिका पिअरसन (Gina Torres), आर्थिक बाबतींत चाणक्य असलेला पण आपल्या अतिभावनिक वृत्तीने अनेकदा स्वतःला आणि कंपनीलाही अडचणीत आणणारा तरीही एकनिष्ठ असलेला लुइस लिट् (Rick Hoffman),’ Awesome’ Legal Secretary असलेली, वेळप्रसंगी स्वतःला त्रास होऊनही प्रत्येक जवळच्या व्यक्तीला आधार, सल्ला देणारी आणि वेळोवेळी खडसावणारीही अशी प्रेमळ Donna Paulsen (Sarah Rafferty), आणि last but not the least म्हणजे Mikeचा खंदा आधार असलेली त्याची गर्लफ्रेंड/fiance आणि आपल्या कंपनीशी एकनिष्ठ असणारी अतिशय हुशार Paralleagal आणि कायद्याची विद्यार्थिनी अशी Rachel Zane (मेघन मार्कल)… प्रत्येक पात्राला यात स्वभावविशेष आहे आणि तो प्रेक्षकांसमोर अगदी नेमका, चपखल येतो. याशिवाय अधूनमधून येणारे Daniel Hardman, Jeff Malone, Katrina Bennette, Robert Zane, Trevor Evans अशी अनेक पात्र त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यानुसार अगदी लक्षात राहतात.
काही बाबतींत ही मालिका नक्कीच कमी पडते. सीजन ४ आणि ५ ला थोडी एकसुरीपणाकडे झुकते पण नंतर लगेच पकड घेते. नवीन प्रेक्षक सलग पाहतीलच असं नाही. संवादांतही तोचतोचपणा आहे. प्रत्येक पात्र एकसारखेच संवाद म्हणतं. ‘What are you talking about ?’, ‘Sh** the bed’, ‘Get your a** back’ या आणि अशा अनेक phrases जवळजवळ प्रत्येक पात्र वापरतं. पात्रापात्राप्रमाणे संवादांत विविधता नाही. कदाचित कायद्याच्या बाजूने कथेतही चुका असू शकतील. शिवाय मुख्य पात्रांव्यतिरिक्त त्याच कंपनीतली पात्र फार काही interfere करत नाहीत हेही जरा खटकतं, कारण कॉर्पोरेट क्षेत्रातल्या अटीतटीच्या लढाईत कुणीच कुणाचे पाय खेचायला मागेपुढे पहात नाही.
पण एकंदरीत खिळवून ठेवणारी मालिका आहे. Mike वर कोर्टात केस चालू असते तो भाग किंवा Mike ला NY Bar मध्ये स्वीकारलं जाण्याचा भाग किंवा Daniel Hardman बरोबरची कॉर्पोरेट लढाई हे भाग अतिशय उत्कंठावर्धक झाले आहेत.
Suits मध्ये आवडलेली आणखी एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे एकनिष्ठता. आपल्या कंपनीला Suits च्याच भाषेत सांगायचं तर ‘Heart, Sweat, Blood and Soul’ देणारी पात्र विशेष भावली.
तुमच्यासमोर काहीही समस्या असो पण इच्छाशक्ती असेल त त्यावर काही ना काही उपाय सापडतोच ही फार मोठी गोष्ट Suits शिकवून जाते. आणि म्हणूनच Corporate Law World मधली अटीतटीची लढाई दाखवणारी अशी मालिका ७-८ सीजन्स होण्याइतकी लोकप्रिय होते !
“What are your choices when someone puts a gun to your head ? You do what they say or they shoot you, Right ?
WRONG. You take the gun, or you pull out a bigger one. Or, you call their bluff. Or, you do any one of a hundred and forty six other things.”
अशा भारी quotes मुळे Suits खास आवडून जाते ! 😊
-कौस्तुभ दीक्षित
२४ मार्च २०१८