एक निवांत असा शनिवार म्हणजे वीकएंडचा दिवस, इंग्रजी हिवाळ्याचे शेवटचे दिवस सुरू असल्यामुळे तापमान १०च्या घरात आणि हळूहळू गर्दी वाढू लागलेली. रात्री साडेआठची वेळ, Cineworldच्या Unlimited Cardच्या कृपेमुळे आपला आणखी एक छानसा सिनेमा बघून झालेला असतो.
स्थळ : पिकॅडली लाइनवरची एक ट्रेन
Arsenal स्टेशन येतं. एक कुटुंब; नवरा, बायको, एक मुलगा साधारण १०-१२ वर्षांचा आणि मुलगी फारफार तर ५-६ वर्षांची. दोघांच्या अंगात Arsenalची जर्सी आणि Arsenalचंच जॅकेट. इतका वेळ शांत असणाऱ्या त्या ट्रेनच्या डब्यात ती छोटी एकदम चैतन्य आणते. आल्या आल्या आईने बसायला दाखवलेली एक जागा धुडकावत ती मुलगी सरळ जाऊन सामान ठेवायच्या जागेशी दरवाजाजवळ जाऊन उभी राहते आणि डब्यातल्या वरच्या आडव्या दांड्याशी खेळू लागते. तिला उडी मारून त्या दांड्याला लटकायचं असतं पण तिचे पाय पोचत नाहीत. तिचे खेळ सुरू झालेले पाहून तत्पर वडील येऊन उभे राहतात. पाठोपाठ मुलगाही येतो. तोही बहिणीचं बघून दांड्याला लटकायला बघतो, पण त्याचं अगदी उलट ! बिचाऱ्याचे पाय आता पोचू लागलेले असतात, त्यामुळे चिरंजीव लटकलेले आहेतही, नाहीतही अशा विचित्र अवस्थेत असतात. पण इकडे भावाचं बघून बहिणीला अजून चेव चढतो. ती अजून जोरात उड्या मारू लागते.
“Daddy, I am almost able to reach with one hand !!!” बाबा तिचे ते प्रयत्न कौतुकाने बघत असतातच. ते तिला एक युक्ती सुचवतात. त्याप्रमाणे बाजूच्या सीटच्या आधाराने त्या छोटीच्या प्रयत्नांना यश येतं आणि ट्रेनमधला हँगिंग बार ती अखेर सर करते !! गड सर केल्याचा बालसुलभ आनंद चेहऱ्यावर येऊन ती विलक्षण खूश होते.
एव्हाना भावाने आपला मोर्चा समोरासमोरच्या दोन दरवाजांमधल्या उभ्या दांड्याकडे वळवलेला असतो. त्याला एका हाताने धरून अपकेंद्री बलाने (Centrifugal Force) त्याच्याभोवती फेऱ्या मारणं चालू होतं. हे म्हणजे साधारण ‘स्वदेस’मधला शाहरुख खान हिरॉईनला आलेलं स्थळ नकार देत परत गेल्यानंतर आनंदाने खांबाभोवती गोल चक्कर मारतो अगदी तसंच !! आपल्या या शाहरुख भावाला बघून मागे राहिली तर ती उद्योगी बहीण कसली ?? तीही येते आणि दोघंही तो खेळ खेळू लागतात.
या सगळ्या बाललीला पाहून आपण मात्र थेट भारतात जातो, १५-२० वर्ष मागे.... आपण शिवाजी पार्कच्या तेव्हा ‘माई मंगेशकर उद्यान’ न झालेल्या बागेत बागडत असतो, सांताक्रूझला आजीच्या घरासमोरच्या बागेवरच्या पिवळ्या घसरगुंडीवर खेळत असतो, किंवा जुहूच्या विमानाच्या बागेत आलेलो असतो, किंवा विरारच्या J P Nagarमधल्या गणेश मंदिराबाजूच्या बागेत इकडून तिकडे धावत असतो.... कोणी मित्र असतील तर त्यांच्यासोबत, नाहीतर एकटा जीव सदाशिव मजा करायला मोकळा ! पण मध्ये कितीही काळ गेला किंवा देश जरी बदलला तरी लहान मुलांची निरागसता तीच ! आयुष्यात कधी न अनुभवलेलं (No Regrets Btw) सख्ख्या भावा-बहिणीचं नातं आपल्याला ती १५ एक मिनिटं विनासायास समोर बघायला मिळतं. थोड्यावेळाने King’s Cross स्टेशन येतं. ते कुटुंब उतरून निघूनही जातं. पण आपल्याला पुढचा सगळा वेळ तेच आठवत राहतात. पुन्हा दिसतील का तसेच खेळताना अशाच एखाद्या प्रवासात ? की आपल्याला पुन्हा कधीच न दिसण्यासाठी उतरले असतील ? दिसले तर आनंदच आहे, नाही दिसले तर समजू की ते सगळेजण King’s Cross स्टेशनला उतरले ते ‘Platform 9¾’ ला जाण्यासाठी.... हे मनपण ना, काहीही विचित्र विचार करत असतं....

-कौस्तुभ दीक्षित
४ मार्च २०१७
४ मार्च २०१७